ठाणे

मोटार बाईक अँब्युलन्सचे महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या शुभहस्ते लोकार्पण

ठाणे (संतोष पडवळ ): अपघात ठिकाणी जलदगतीचे पोहचण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोटार बाईक अँब्युलन्सचे लोकार्पण महापौर सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच सभागृह नेते नरेश म्हस्के व महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थित आज महापालिका भवन येथे करण्यात आले.

यावेळी शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.राधिका फाटक,गालिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती सौ.पूजा करसुळे,नगरसेविका मृणाल पेंडसे,नगरसेवक सुहास देसाई, भूषण भोईर,सुधीर कोकाटे,अतिरिक्त आयुक्त(१) राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे,उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे,अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर.टी.केंद्रे,उप नगर अभियंता जगदीश घोलप आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने अन्वेचर २०० क्रुझ मॉडेल या बाईकची निवड करण्यात आली असून या बाईकमध्ये ३ अत्याधुनिक प्रथमोपचारच्या किट ठेवण्यात आल्या आहेत.शहरात अपघात ठिकाणी तात्काळ पोहचण्यासाठी या बाईकचा वापर करण्यात येणार आहे.अपघात ठिकाणी या अँब्युलन्सच्या माध्यमातून प्रथमोपचार केला जाणार आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने १५ मोटार बाईक अँब्युलन्सचे आज लोकार्पण करण्यात आले असून शहरात एकूण ३० मोटार बाईक अँब्युलन्स कार्यरत असणार आहेत. या मोटार बाईक अँब्युलन्सचा शहरातील नागरिकांना मोठ्या फायदा होणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!