सोन्याची मूठ असलेल्या शिवरायांच्या भवानी तलवारीच्या हुबेहूब प्रतिकृतीचा दिव्यात 6 फेब्रुवारी भव्य दर्शन सोहळा
अखंड कोकण महोत्सव च्या उदघाटन निमित्ताने नागरिकांना मिळणार मोफत प्रवेश
कोकणचे नेते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार महोत्सव चे उदघाटन
दिवा:-शिवरायांनी गाजवलेल्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या व इतिहासकार *राजमाता जिजाऊंचे वंशज प्रा नामदेवराव जाधव* यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भवानी तलवारीच्या हुबेहूब प्रतिकृतीचा भव्य दर्शन सोहळा दिवा येथे आयोजित अखंड कोकण महोत्सव च्या उदघाटन प्रसंगी ठेवण्यात आला आहे.यावेळी जाधव यांचा गाजलेला उद्योजक शिवाजी महाराज हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.
*6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान दिवा प्रेरणा टॉवर मैदानात अखंड कोकण महोत्सव* चे *आयोजन भाजप व सेव्ह दिवा फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे* .राज्यमंत्री व कोकणचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते या महोत्सवचे उदघाटन होणार असून राजमाता जिजाऊंचे वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या महोत्सवच्या उदघाटन प्रसंगी खास आकर्षण म्हणून शिव भक्तांसाठी भवानी तलवारिचा भव्य दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.नागरिकांना भवानी तलवार कशी होती हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे.हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आला आहे.6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गणेश नगर ते दिवा कोकण महोत्सव दरम्यान भवानी तलवारीची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.दिवा शहरातून या भवानी तलवारीच्या दर्शन सोहळ्याला सुरवात होणार असून यानंतर ही भवानी तलवार जगभर शिवभक्तांना पाहता येणार असून तिचे दर्शन सोहळे विविध ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत.7 फेब्रुवारी रोजी उत्सव अखंड कोंकण संस्कृती चा हा मनोरंजन चा कार्यक्रम दिव्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला असून 8 फेब्रुवारी रोजी कोकणातील जाखडी नृत्याची जुगलबंदी ची मेजवानी रसिकांना पाहता येणार आहे.तर 9 फेब्रुवारी रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 10 फेब्रुवारी रोजी कोकणी दशावतार नाटकाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे.दिव्यात पहिल्यांदा अखंड कोकण महोत्सव होत असल्याने दिव्यात वास्तव्य करणाऱ्या संपूर्ण कोकणातील नागरिकां मध्ये उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे.या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले,दिवा भाजप सरचिटणीस व सेव्ह दिवा फाऊंडेशन चे अध्यक्ष रोहिदास मुंडे,युवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर,चित्रपट आघाडीचे विकास इंगळे यांनी केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सामील व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.