ठाणे

खोणी ग्रामपंचायतीवर भाजपचे पुन्हा वर्चस्व…  लीलाबाई पाटील यांचा विजय…  

डोंबिवली :- दि. ३१ ( शंकर जाधव ) खोणी ग्रामपंचायतिच्या सरपंचपदाची  पोटनिवडणुक गुरुवारी शांततेत पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मनसुभा उधळून लावत भाजपच्या लीलाबाई पाटील विजयी झाल्या.याआधी भाजपचे हनुमान ठोंबरे हे सरपंचपदावर निवडून आले होते.या विजयाचे श्रेय राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, नगरसेवक महेश पाटील तथा ग्रामीण पदाधिकारी महेश पाटील आणि मित्र परिवार यांना असल्याचे नवनियुक्त सरपंच लीलाबाई शंकर पाटील यांनी सांगितले.ही निवडणूक शांततेत पार पडली.निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कडकपोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  भाजपचे सरपंच हनुमान ठोंबरे यांचे जात प्रमाणपत्र शासनाच्या जात पडताळणी विभागाकडे उशिरा पोहोचल्याने त्याचे सरपंच पद अपात्र ठरले होते.

       खोणी गावात पार पडलेल्या निवडणुकीत  लीलाबाई शंकर पाटील निवड तर उपसरपंचपदी आशाताई वंसत जाधव याची निवड झाली.या निवडणुकीत मंडळ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त मतदान पद्धतीने मतदान करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने वंदना शांताराम ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपचे सदस्य आशाताई जाधव, भारती भानुदास फराड, उज्वला जयेश काळोखे, पूजा संजय पाटील, अंकुश ठोंबरे हे सदस्य उपस्थित होते.यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विजयी उमेदवार लीलाबाई पाटील यांचे अभिनंदन केले. राज्यमंत्री चव्हाण म्हणाले. भाजपचे भविष्यातील नेते म्हणून हनुमान ठोंबरे हे काम पाहत आहेत.वेळेत त्यांचे प्रमाणपत्र जात पडताळणी विभागाकडे शासनाच्या माध्यमातून न पोहोचल्याने त्याचे सदस्यपद व सरपंचपद रद्द झाले.त्यामुळे खोणी ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच असावा यासाठी गावकऱ्यांनी एकमुखाने भाजपच्या उमेदवाराची निवड केली. या भागात कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली आहे. त्यामुळे या भागातील गावकऱ्यांनी  भाजपवर विश्वास दर्शविला आहे. येत्या काही वर्षात भाजपचे खोणी गावातील कार्यकर्ते टप्पाटप्पाने भाजपचे नेतुत्व करतील.जो विकास झाला आहे. त्याला गती कशी देता येईल यासाठी प्रयत्न करतील. पुढे हनुमान ठोंबरे म्हणाले,खूप वर्ष राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पडले होते. त्यात सेल टाकला होता.पण ते घड्याळ चालले नाही. राष्ट्रवादीला या निवडणुकीत पराजय पत्करावा लागला. गावच्या विकासाऐवजी त्याच्या डोळा ग्रामपंचायतीच्या तिजोरीवर होता.भ्रष्टाचार करण्याची त्याची वृत्ती आहे.ग्रामपंचायत बळकावण्याचे त्याचे स्वप्न गावकऱ्यांनी हाणून पडले. शांताराम ठोंबरे यांच्या पत्नी वंदना ठोंबरे यांना आम्हीच ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडणून आणले होते.या विजयात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे.नवनिर्वाचीत सरपंचच्या पाठीशी उभे राहून राहिलेली विकास कामे पूर्ण करू. शिवसेनेचा गावात कोणताही त्रास नाही. केंद्रात, राज्यात जसे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, तसे या गावातहि आहे.सेना-भाजप खांद्याला खांदा लावून गावाचा विकास करणार आहे. खोणी गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा १८ फुटी अश्वरूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. याचे काम कोल्हापुरातील कलाकाराकडे देण्यात आले आहे, असेही ठोंबरे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!