गुन्हे वृत्त

चार वर्षापूर्वी घरातुन पळालेल्या मुलाचा शोध घेण्यास ठाणे क्राईम ब्रांचच्या AHCT युनिटला यश

ठाणे :- चार वर्षापूर्वी वसंत विहार येथील केतकी सोसायटीत राहणाऱ्या फुलचंद सूकूरूराम चंद्रा यांचा 15 वर्षाचा मुलगा कु .सुमेध चंद्रा हा नववी मध्ये नापास होण्याच्या भीतीने दिनांक 27/03/2015 रोजी घरातुन पळुन गेला .चार वर्षानी अथक परिश्रमाने ठाणे क्राईम ब्रांचने त्याला शोधुन काढुन आई वडिलांच्या स्वाधीन केले .

या केस मध्ये फुलचंद्र चंद्रा यांनी पोलीस व्यवस्थित तपास करत नाहीत म्हणुन हायकोर्ट मध याचिका दाखल केली होती , त्या मध्ये त्यांनी पोलिसांकडून तपास काढुन घेउन सीबीआय कडे ध्यावा अशी मागणी केली होती , पोलीसांनी या प्रकरणात जवळ पास 100 लोकांच्या स्टेटमेंट घेतले होते , 150 ते 200 सीसीटीव्ही तपासले होते , त्यांच्या तपासात हायकोर्टने वेळोवेळी समाधान व्यक्त केले होते , पोलिसांच्या तपासाची दिशा बघुन सीबीआय कडे तपास सोपवण्याची गरज नसल्याचे हायकोर्ट ने सांगीतले होते .

सुमेध घरातुन पळुन गेल्यानंतर त्याच्या शोध लागण्या साठी पोलीसांनी त्याच्या नावाचे पोस्टर ठिकठिकाणी लावले होते , टीव्हीवर फोटो सकट माहीती दिली होती , त्याच गोष्टीचा फायदा घेउन दिनांक 1/04/2015 रोजी एका इसमाने फुलचंद्र चंद्रा यांच्या मोबाईल वर फोन करून मुलाची सुटका करायची असेल तर एक लाख रुपयाची खंडणी मागीतली , तेव्हा पोलीसांनी या आरोपींचा शोध घेउन तिन आरोपींना पकडले व त्यांच्यावर 387 प्रमाणे गुन्हा दाखल केला , पोलीसांनी या तिनही आरोपींना अटक केली त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्या मुळे सुटला व दोन आरोपी अजुन जेल मध्ये आहेत , त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी पोस्टर बघुन मुलाच्या वडिलांना फोन केल्याचे सांगीतले , त्या नंतर सुध्दा मुलाचा शोध लागला नाही , त्या वेळी तपास अधिकारी सहाय्यक आयुक्त भरत शेळके यांच्या कडे होता पण नंतर ते निव्रुत्त झाल्या नंतर या गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या कडे आला , या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना माहीती मिळाली की अपह्रूत मुलगा हा नवी मुंबई येथील नेरूळ येथे आहे व त्याने नेरूळ येथील स्टेट बँक मध्ये खाते उघड्ल्याचे समजले , त्या प्रमाणे बँकेत चौकशी केली असतात्याने 30/1/2019 रोजी बँकेत खाते उघड्ल्याचे स्पष्ट झाले , त्याला बँकेत बोलवून त्याला ताब्यात घेण्यात आले ,

सुमेध कडे चौकशी केली असता तो सन 2015 रोजी वर्तकनगर येथील लिटिल फ्लॉवर शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिकत होता , आपण 9 वी मध्ये नापास होऊ व आपल्याला वडील ओरडतील या भीती पोटी तो घरातुन निघून गेला होता , तो तेथून नाशिक येथे गेला तीथे एका हॉटेल मध्ये तो कामाला लागला , पण हॉटेलवाल्यांनी टीव्हीवर ह्या मुलाचा फोटो बघितल्या नंतर पोलीसांना न कळवता त्याला कामावरून काढुन टाकले , त्यानंतर तो कल्याण येथे एका कटरर्स कडे कामाला लागला , तेथून तो नेरूळ येथील शीरवणे गावात मित्रांबरोबर कटरर्स कडे वेटरचे काम करू लागला , त्याचे कोणीही अपहरण केलेले नसुन तो स्वतःहून भिती पोटी घरातुन निघून गेल्याचे सांगीतले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!