मुंबई

अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

मुंबई :  अभिनेत रमेश भाटकर यांचे मुंबईत

निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला.

खरे तर त्यांच्या बरोबर एक कलाकार म्हणून काम करण्याचा इच्छा होती, पण ती काही पूर्ण झाली नाही. नंतर काही वर्षांनी ” साहेब ” चित्रपटाच्या निमित्ताने असोसिएट दिग्दर्शक म्हणून त्यांच्या बरोबर काम करण्याचा योग आला. फार चांगला अनुभव व एक कलाकार त्या भूमिकेत समरस होण हे त्यांच्या कडून पाहायला मिळाले. तेव्हा पासून आम्ही एकमेकांच्या संपर्क मध्ये होतो. साहेब चित्रपटाचे दिग्दर्शन के विलास यानी केले होते तर वंदना जाधव व संतोष जाधव यानी या चित्रपटाची निर्मिती केली होती. कमांडर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये झळकलेले प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर  गायक-संगीतकार वासूदेव भटकर यांच्या घरी 3 ऑगस्ट 1949 मध्ये रमेश भाटकर यांचा जन्म झाला होता. 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. वयाची 69 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम  असायचा. वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेह-यावर म्हातारपणाच्या म्हणाव्या तितक्या खुणा दिसत नव्हत्या. काही दिवसांपूर्वीच ते ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत दिसले होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अश्रूंची झाली फूले हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. १९७७ ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!