ठाणे

महानगर टेलिफोन निगमच्‍या मालमत्तेवर टाच…..आयुक्तांच्या आदेशान्वये कारवाई

ठाणे (संतोष पडवळ ): ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ताधारकांकडून थकीत मालमत्‍ता कर वसुल करणेकरिता कडक कारवाई करण्‍याबाबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आज एमटीएनएलवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार प्रभाग स्तरावरुन थकीत मालमत्‍तांना वॅारंट व जप्‍ती आदी कारवाई करण्यात येत आहे.
त्यानुसार आज एमटीएनएलच्या गरुडा व डॉल्फिन या कंपनीने ठाणे महापलिकाक्षेत्रात उभारलेल्‍या मोबाईल टॉवर क्षेत्राची रक्‍क्‍म रु 68 लक्ष इतका मालमत्‍ता कर थकीत असल्‍याने करवसुलीच्‍या कारवाई अंतर्गत कंपनीचे एमटीएनएलच्या चरई एक्‍सेंज या इमारतीवर वॅारंट व जप्‍तीची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान ज्यांनी मालमत्ता कर अद्यापपर्यंत जमा केलेला नाही अशा थकीत मालमत्ताधारकांवर वॅारंट, जप्‍तीची व लिलावाद्वारे मालमत्‍तेची विक्री या सारख्‍या अप्रिय कारवाई टाळण्‍यासाठी मालमत्ताधारकांनी कराची देय रक्कम महापालिकेकडे तात्काळ जमा करावी असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे
नागरिकांना मालमत्ता कर जमा करणे सोईचे व्हावे या दृष्टीकोनातून दिनांक 31 मार्च, 2019 पर्यत महापालिकेची सर्व मालमत्ता कर संकलन केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (दिनांक 21 मार्च, 2019 वगळून) पुर्णवेळ तसेच सर्व रविवारी सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत कार्यान्वित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.inया संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने तसेच Digithane या प्‍लॅटफॉर्मद्वारेही मालमत्‍ता कर जमा करण्‍याची अतिरिक्त सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा लाभ घेत सर्व मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर वेळेत भरुन सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!