ठाणे

महापालिका शाळांतील मुलांना मिळाली दंत चिकित्सा , आदित्य ठाकरे व पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे (संतोष पडवळ ) – ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग आणि हेल्दी स्माईल संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दंत चिकित्सा शिबीराचे उद्घाटन आज शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

वर्तकनगर येथील शाळा क्रमांक 44 येथे संपन्न झालेल्या या शिबीराला आमदार प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती व स्थानिक नगरसेविका सौ. राधिका राजेंद्र फाटक, गलि्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती सौ. पुजा संदीप करसुळे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा सौ. रागिणी बैरीशेट्टी, नगरसेवक व शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक पूर्वश सरनाईक, नरेंद्र सुरकर, नगरसेविका सौ. नंदिनी विचारे, सौ. विमल भोईर, सौ. कल्पना पाटील, सौ. आशा डोंगरे, कु. प्रियांका पाटील, अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे, माजी महापौर संजय मोरे, माजी नगरसेवक विहंग सरनाईक, माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले, उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी शेशराव बडे आणि हेल्दी स्माईल संस्थेच्या कु. डॉ. सलोनी मयेकर, डॉ. चेतना अग्रवाल आदी उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या 120 शाळांमधील पहिली ते पाचवी या वर्गात एकूण 14000 विद्यार्थी शिकत आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना हेल्दी स्माईल या संस्थेच्या पुढाकाराने दंत चिकित्सा करण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!