मुंबई : 1 फेब्रुवारी 2019 रोजी च्या पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास वडाळा टी टी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई पोलीस शिपाई (बक्कल नंबर. 090894) राजकिरण उत्तम बिळासकर गस्त घालत असताना मोटारकार चालकाचा संशय आल्याने पोशि बिळासकर यांनी मोटारसायकलवरून पाठलाग करून मोटार कार अडवली. कारमधील 2 जणांची झडती घेतली असता एकाकडे हत्यार आढळून आले. चौकशी दरम्यान कार चोरीचे असल्याचे समोर आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून चोरट्यांना अटक केली.
एकट्या पोशि राजकिरण बिळास्कर यांनी केलेल्या धडाकेबाज कारमगिरीची माहिती समजताच मुंबई पोलीस कुटुंब प्रमुख पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास अचानक वडाळा टी टी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलीस शिपाई राजकिरण बिळासकर यांचे कौतुक करून अभिनंदन केले. अशा प्रकारे सर्वांनी कर्तव्य केले पाहिजे, जेणेकरून मुंबई पोलीस खात्याची प्रतिमा आणखी उंचावेल. मात्र कर्तव्य बजावताना स्वत:च्या जिवाची काळजी घ्या, असा भावनिक सल्ला या निमित्ताने पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी मुंबई पोलिसांना दिला.
दरम्यान, पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी पोशि राजकिरण बिळास्कर यांना 20 हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांच्या कर्तव्याचे कौतुक केले. तसेच परिमंडळ 4 चे उपायुक्त एन. अंबिका, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अकुंश काटकर, पोनि (कायदा व सुव्यवस्था) अारगडे, सपोनि भास्कर जाधव व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन या सर्वांनी पोशि राजकिरण बिळासकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.