ठाणे

नो एन्ट्री मध्ये पोलिसांनी केली इन्ट्री…… शिवनलिनी प्रतिष्ठानने दिले चॉकलेट ….

डोंबिवली ( शंकर जाधव ) नागरिकांना कायदा आणि नियम शिकविणारे पोलीस आता नियमांचे उल्लंघन करत असल्याची वास्तविकता समोर आली आहे.वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे जसे नागरिकांना बंधनकारक असते तसे पोलिसांनाही बंधनकारक असते.मात्र शहर पोलीस वाहतूक नियमाचे पालन करत नसल्याने त्यांना शिवनलिनी प्रतिष्ठानने चॉकलेट देऊन विंनती केली.त्यामुळे वाहतुकीचे नियम शहर पोलीस पायदळी तुडवीत दिसुन आले. जिथे पोलीसच वाहतुकीचे नियम पाळत नसतील तिकडे सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा करावी असा प्रश्न यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याना पडला.

डोंबिवली पूर्वेकडील आनंद बालभवन येथील चिपळूणकर पथावर नो इन्ट्रीचे फलक लावले आहे.मात्र या नियमाचे उल्लंघन करत सर्रासपणे नो इन्ट्री मध्ये वाहन चालवितात.सदर ठिकाणी येणाऱ्या वाहनचालकांना शिवनलिनी प्रतिष्ठान महाव्यवस्थापक अनिरुद्ध कुलकर्णी, कल्याण तालुका अध्यक्ष नितीन कोळी, शहर अध्यक्ष दत्ता वाठोरे,समाधान पवार, मिलिंद कांबळे, ध्रुव मेहता, उमेश आत्तेकर, अमित दुखडे, जितेंदें अमोलकर, श्रीधर सुर्वे यांसह डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक एस.एन.जाधव व कर्मचाऱ्यांनी चॉकलेट देऊन वाहतूक नियम पाळा अशी विनंती केली.काही वाहनचालकांना समज देऊन झाल्यावर जाधव हे आपल्या कर्मचाऱ्यांसह अन्य ठिकाणी वाहतुक कोंडी सोडविण्यास गेले.त्यानंतर याच रस्त्यावर शहर पोलीस मोटरसायकलीवर हेल्मेट न घालता बिनदिक्कतपणेनो इन्ट्री मधून जात होते.त्यावेळी शिवनलिनी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी या पोलिसांना थांबवून वाहतूक नियमाचे पालन नागरिकांनी करावे तसे आपण करावे सांगून त्यांना चॉकलेट दिले. दरम्यान , ‘नो इन्ट्री मध्ये येणारा वाहन चालक गाढव’आहे असे फलक या ठिकाणी लावण्यात आले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!