ठाणे

परराज्यातील दोन हरविलेल्या मुली ,आई वडिलांच्या ताब्यात…. ठाणे पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी

ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन येथे25 दिवसापूर्वी एक 17 वर्षाची महीला व तिच्या सोबत 3 ते 4 वर्षाची एक लहान मुलगी बेवारस पणे मिळुन आल्या होत्या , उत्तरप्रदेश येथिल ह्या मुलींचा पत्ता शोधुन त्यांच्या आईवडिलांना इथे बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहेत .

दिनांक 15/01/2019 रोजी
शनीचरण वय 17 वर्ष व शनिया वय 4 वर्ष ह्या दोन बहिणी चुकुन उत्तरप्रदेश येथुन मुंबई येथील ट्रेन मध्ये बसल्या व ठाणे स्टेशन येथे पोहचल्या , त्यातील शनिचरण ही 17 वर्षाची तरुणी मनोरुग्ण आहे , ह्या दोघी ठाणे स्टेशन येथे अशाच बेवारस स्थिथित फिरत होत्या, ठाणे कोपरी पोलीस स्टेशनने त्यांना ताब्यात घेउन त्यांची विचारपूस केली असता त्यांना स्वतःहा बद्दल काहीही सांगता येत नव्हत , त्यांच्या पालकांचा शोध होईपर्यत व त्यांना सुरक्षित ठेवण्याकामी मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांच्या पुढे हजर केले असता , मोठ्या मुलीस मनोरुग्णालय ठाणे येथे उपचारार्थ व लहान मुलीस जननी आशिष संस्था डोंबिवली येथे सुरक्षित ठेवण्याचे आदेश पारित केले , मनोरुग्णालय ठाणे येथील वैद्यकीय डॉ .संजय बोधडे यांनी मनोरुग्ण महिलेवर उपचार सुरु केले , न्याय दंडाधिकारी राजेंद्र तांबे यांनी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर व ठाणे नगर पोलीस ठाण्याचे रविकांत मालेकर यांना दोन्ही मुलींच्या पालकांचा शोध घेण्याचे आदेश दिले .

पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी एक स्वतंत्र पोलीस पथक तयार करून भोजपुरी भाषेची माहीती असलेली महिलेस मदतीस घेउन मनोरुग्ण महिलेकडे सतत जाऊन तिची चौकशी करून मिळालेल्या अपुऱ्या व त्रोटक माहितीच्या आधारे व तांत्रिक सहाय्याने मुलींच्या पालकांचा शोध लावला , उत्तर प्रदेश येथील दिलदार नगर पोलीस स्टेशनचे एस एच ओ विमल मिश्रा यांच्या मदतीने मुलींचे वडील कमलेश राय यांच्याशी संपर्क साधून दोन्ही मुली त्यांच्याच असल्याची खात्री केली , या दोन्ही मुली त्यांच्या आत्या कडे रहायला गेल्या होत्या , दिनांक 12/1/2019 रोजी रेल्वेने घरी येणासाठी निघाल्या होत्या , परंतु त्या घरी नपोहचता रेल्वेने थेट ठाणे येथे आल्याचे निष्पन्न झाले .

या दोन बहिणींचा शोध त्वरित लागावा या साठी न्यायदंडाधीकारी राजेंद्र तांबे यांनी वयक्तिक लक्ष घालुन पोलीस यंत्रणेला आदेश दिले होते , तसेच स्वखर्चाने नवीन कपडे व जीवनावश्यक वस्तु घेउन दिल्या ,या प्रकरणी पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकात मालेकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता गायकवाड यांनी आपापल्या परीने दोन्ही बहिणींच्या पालकांचा शोध घेण्याच्या कामी अवरीत परिश्रम घेतले .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!