ठाणे :- ठाणे पोलीसांनी चोरीला गेलेल्या गाड्या पकडण्याचा धडाकाच लावला आहे , गेल्याच आठवड्यात 80 चारचाकी गाड्या पकडण्यात पोलिसांना यश आल होत त्याचा तपास सुरु असतानाच , ठाणे नगर आणि कळवा पोलीसांनी 21 चोरीला गेलेल्या टु व्हिलर गाड्या पकडल्या आहेत , त्यात विशेष म्हणजे चोरी करणारे दोन आरोपी यांना रेड हँड पकडण्यात यश आले आहे .
ठाणे शहरा मध्ये दुचाकी वहाने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते त्या निमित्ताने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पोलीसांना तशा सूचना दिल्या होत्या , त्या प्रमाणे परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस .स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवीकांत मालेकर व कळवा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दुचाकी चोरी होत असलेल्या ठिकाणाचा अभ्यास करून सापळे लावले , तसेच़ बातमीदारा मार्फत माहीती मिळवणे सुरु असताना दिनांक 1/2/2019 रोजी पोलीस नाईक रोकडे पोलीस शिपाई बच्छाव हे गस्त घालत असताना राजा मोबीज शेख वय 20 वर्ष राहणार नेरूळ सेक्टर 23 धारावे गाव नवी मुंबई मुळ गाव अमरूल अच्छा , जिल्हा हसनाबाद चाक पच्छिम बंगाल याला डुप्लिकेट चाव्या व स्क्रु ड्रायव्हर सह सिडको स्टँड येथे रंगेहाथ पकडले , त्याच्या कडुन त्याचा साथीदार गना बबलू पठाण वय 25 राहणार महादेव तांडेल इमारतीमधील रूम नंबर 8 सीवुड नवी मुंबई या दोघांकडुन चोरी केलेल्या 11 दुचाकी वाहने अंदाजे किंमत 4,25,000/- रुपये हस्तगत केली , ही वाहने त्यांनी ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 3 , पनवेल पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 2 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत , उर्वरित 6 गाड्यांचे इंजिन व चेसीस नंबरवरून मालकाचा शोध घेणे चालु आहे , आरोपी गना बबलू पठाण हा व्यवसायाने मेकेनिक असुन तो वाहन चोरल्या नंतर नंबरप्लेट व काही वाहनांचे इंजिन नंबर मध्ये फेरफार करून लोकांना 10 ते 15 हजार रुपयाला विकत असत , तसेच कळवा पोलीस स्टेशनच्यागस्त पथकातील पोलीस शिपाई ढेबे हे गस्त घालत असताना आरोपी प्रशांत प्रकाश जुवळे वय 23 वर्ष राहणार दिघा ठाणे हा संशयास्पद रित्या फिरताना त्याची झडति घेतली असता त्याच्या कडे वाहन चोरी साठी लागणारे साहित्य मिळुन आले , त्याच्या कडे सखोल चौकशी केली असता त्याने कळवा पोलीस स्टेशन हद्दीतुन 8 आणि मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 2 अशी 10 दुचाकी वाहनअंदाजे किमंत 10 लाख रुपये चोरल्याचे कबुल केले , हा आरोपी गाड्या विकताना लोकांना आरटीओ कार्यालयात जमा झालेल्या गाड्या मी सोडवून घेतो आणि त्या रिपेअर करून विकतो असे सांगायचा चोरलेल्या गाड्या त्याने रत्नागिरी खेड येथील एका व्यक्तीला, एमआयडीसी येथील कामगारांना कमीत कमी किमतीत विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे , ह्या चोरीच्या गाडी मधिल एक गाडी त्यानी स्वतः हा साठी ठेवली होती .
ठाणे पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस .स्वामी यांनी लोकांना आव्हान केले आहे की आपल्या दुचाकी गाड्या पार्किंग लॉट मध्येच पार्क कराव्या , त्यांना चांगल्या प्रकारचे लॉक बसवावे , जीपीएस सिस्टीम बसवावे जेणे करून गाड्या चोरीला जाणार नाहीत , तसेच जर कोणी तुम्हाला 50 ते 60 हजाराची गाडी 10 ते 15 हजाराला विकत असेल तर त्यांच्या कडुन अशा गाड्या विकत घेऊ नका ते तुम्हाला आरटीओ ने पकडलेल्या गाड्या आहेत , बँकेने खेचुन आणलेल्या गाड्या आहेत अशा थापा मारतील पण अशा भूलथापानां भुलून गाड्या घेऊ नका , तसेच अशी लोक गाड्या विकण्यासाठी तुमच्या कडे आली तर लगेच त्यांची माहीती पोलिसांना कळवावी .