ठाणे

MIDC कडील प्रलंबित प्रकरणांचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

ठाणे (संतोष पडवळ ) : ठाणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने एमआयडीसीकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेवून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी क्लस्टरसाठी अतिक्रमित जागा उपलब्ध करून देणे, जलकुंभ, बांधणीसाठी, पार्किंगसाठी खुली जागा आणि हॉस्पीटलसाठी सुविधा भुखंड या विषयांवर महत्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

आज महापालिका आयुक्त श्री. जयस्वाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये भूयारी गटार योजनेच्या टप्पा क्रमांक 2 साठी विटावा येथील 1600 चौरस मीटरची जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे त्याबाबत करारनामा करणे, कोपरी येथील प्रक्रिया केलेल्या निर्जंतुक मलजलाचे एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्यांना कमी दराने पाणी पुरवठा करणे, वागळे इस्टेटमधील रस्ता रूंदीकरणाची कामे समन्वयाने मार्गी लावणे, जलकुंभासाठी जागा उपलब्ध करून देणे आदी विषयांबाबत सकारात्मक चर्चा होवून याबाबत महापालिकेने सुधारित प्रस्ताव देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

दरम्यान समुह विकास या महत्वाकांक्षी योजनेबाबत या बैठकीत चर्चा झाली. वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीचे नियोजन प्राधिकरण हे एमआयडीसी असून या वसाहतींचा लेआऊट 50 वर्षांपूर्वी केलेला आहे. या लेआऊटमध्ये कामगारांना निवासाची व इतर कुठलीही सुविधा नसल्याने तिथे काही जागांवर अतिक्रमणे होवून अनधिकृत वसाहती निर्माण झाल्या आहेत. राज्य शासनाने समुह विकास योजनेला दिलेल्या मंजुरीच्या आधारे या लेआऊटमधील अतिक्रमित जागा क्लस्टर योजनेतंर्गत महापालिकेस देणे याविषयी सकारात्मक चर्चा झाली. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ एमआयडीसीला सादर करण्यात येवून त्यास एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता घेण्याविषयी चर्चा झाली.

त्याचबरोबर पार्किंगसाठी ओएस 7 हा भूखंड देणेबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणा-या हॉस्पीटलसाठी मोकळा भूखंड देण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!