मुंबई

आईने आपल्या तान्हुल्या मुलाला गळफास देऊन स्वतः ही संपविले जीवन

मुंबई : प्रतिनिधि – ( संतोष पडवळ) मुंबईतील कुर्ला शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुर्ला येथील बैल बाजार परिसरात एका आईने आपल्या तान्हुल्या मुलाला गळफास दिला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंगारे वाडी येथे अनुजा दीपक वंजारी यांनी आपला चार वर्षांचा मुलगा श्री याला आधी गळफास दिला. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.

शेजाऱ्यांनी खिडकीतून ही घटना पाहिल्यावर पोलिसांच्या मदतीने दोघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. विनोबा भावे पोलिसांनी दीपक वंजारीला ताब्यात घेतले असून प्राथमिक माहीतीच्या आधारे पती दारूच्या अधीन झाला होता.

अनुजाने आज सकाळी आपल्या आईला सोलापूरला फोन करून आपण काही बरे वाईट करणार असल्याचे ही कळवले होते. मात्र आईने तिला असे काही करु नको म्हणून सांगितल्याची माहिती पुढे येत आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!