कल्याण : ऐतिहासिक काळापासून कल्याणात उभ्या असणार्या लालचौकी गणेश मंदीरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. माघी गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रमांच्या माध्यमातून परिसर भक्तीमय होऊन गेला होता.
प्रधान संकल्प, गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृ पूजन, योगिनी मंडल स्थापना पूजन, षोडशोपचार पूजन, अर्थवशिर्ष अभिषेक, नवग्रह देवतांचे होमहवन, अथर्वशिर्षाचे हवन, स्थापित देवतांचे हवन, क्षेत्रपाल बलिदान, पूर्णा आहुतीचा होम आणि महाभंडार्यांचे आयोजन करुन माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
प्रसंगी गणरायाच्या दर्शनासाठी आ. नरेंद्र पवार, नगरसेवक राजेंद्र देवळेकर, नगरसेवक जयवंत भोईर, नगरसेवक प्रभूनाथ भोईर, नगरसेवक सुधीर बासरे, नगरसेवक दशरथ घाडीगावकर याचबरोबर हजारो भक्तांनी दर्शनासाठी उपस्थिती दर्शविली.
माघी गणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सुरेश दत्तुशेठ पाटील, रवी पाटील, राकेश पाटील, नवनीत पाटील, रंगा पाटील, कली हरीभाऊ, भवानी शेखावत, विलास खामकर, महेश म्हात्रे, संतोष गुप्ता, सुरज भंडारी यांच्यासह राजमाता जिजामाता श्री गणेश चॅरीटेबल ट्रस्टचे असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माघी गणेशोत्सवानिमित्ताने आयोजित भंडार्याचा लाभ सात हजार भाविकांनी घेतला.
ऐतिहासिक लालचौकी गणेश मंदीरात माघी गणेशोत्सव साजरा
