ठाणे :- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण पाटील यांनी आज शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम (उप) ,आरोग्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला सोड चिट्ठी दिली. जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे व आमदार सुभाष भोईर यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला. त्यावेळी त्यांच्या सोबत वडवली गावचे देवराम मारुती पाटील, माजी उपसरपंच केशव आंबो पाटील, श्री. संदीप श्रीपत पाटील, सरपंच जयमाला देवराम पाटील, माजी सरपंच अपर्णा संदीप पाटील यांचा ही शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला. त्यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत भोईर, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, शहर प्रमुख राजेश मोरे, उपतालुका प्रमुख बंडू शेठ पाटील, उपतालुका प्रमुख सुखदेव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील, उपविभाग प्रमुख जितेंद्र पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अरुण पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाची ताकद वाढली आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसला खिंडार….. कृ उ. बा. समिती माजी सभापती अरुण पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
February 13, 2019
190 Views
1 Min Read

-
Share This!