ठाणे

अखेर ‘त्या ‘खडीमशिनने केले अख्या गावाच्या घरांचे नुकसान

मुरबाड (प्रतिनिधी गितेश पवार)  : मुरबाड तालुक्यातील कोलठण येथे गेल्या अनेक महिन्यांपासून बेपरवाना खडीमशिनचे काम सुरू होते. या खडीमशिनसाठी लागणारे दगड हे या भागातील डोंगर ब्लास्टिंग करून काढले जात होते. मात्र शनिवारी दुपारच्या सुमारास केलेल्या उच्च दाबाच्या जोरदार ब्लास्टिंगमुळे कोलठण गावातील संपूर्ण ठाकरे नगरच्या राहत्या घरांना तडे गेल्याची विदारण घटना घडली आहे.

यामध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले असून अनेक घरांच्या भिंती, कॉलम, छप्पर कोसळले आहे. यास जबाबदार असणारी खदान ही निलेश सांबरे यांच्या मालकीची असून ती बेपरवाना असल्याचे समोर येत आहे. गावकऱ्यांनी या घटनेची भीती व्यक्त करत होणाऱ्या भीषण परिणामांची पूर्वकल्पना पत्राद्वारे ठाणे जिल्हाधिकारी,मुरबाड तहसीलदार, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तलाठी, व सर्कल यांना दिली होती. मात्र याबाबत कोणत्याही स्वरूपाची कारवाई न झाल्याने सदर धक्कादायक प्रकार घडला असल्याचे पिढीत गावकऱ्यांनी सांगितले आहे. तर गावकऱ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या खडीमशिन मालक व त्यास सहकार्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.

याबाबत तलाठी बागराव यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची माहितीच त्यांना प्रथमच मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी ही या खदानच्या ब्लास्टिंगमुळे घरांवर, शेतात दगडांचे मोठे मोठे तुकडे उडून येत असल्याने मोठी हानी घडून येण्याची शक्यता नागरिकांनी तक्रारीत मांडली होती. त्यामुळे जीव मुठीत घेऊन शेती, बागायती करावी लागत होती.

मात्रअनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. महिला आपल्या कामात तर लहानमुळे आपल्या खेळात व्यस्त असतांना अचानक ही घटना घडली. भीषण आवाज झाले व घरांना एकाएकी तडे जाऊन काही घरांच्या भिंती, कॉलम, जोते व छप्पर जमीनदोस्त झाले. या सर्वांना जबाबदार असणाऱ्या निलेश सांबरे व संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी जेष्ठ ग्रामस्थ तथा माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम ठाकरे यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!