दिवा : प्रतिनिधि ( संतोष पडवळ ) – दिवा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आयोजित प्रभावी बोला जग जिंका या विषयावर नुकतच फ्री सेमिनार आयोजित केले होते. या सेमिनार ला दिव्यातील स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, राजकिय व्यक्ति, आणि शाळेतील विद्यार्थी यांची उपस्थिति लाभली होती. ठाणे महापालिकेचे प्रथम स्थायी समिती अध्यक्ष गोवर्धन चांगो भगत यांनी वक्त्यांची कमतरता आणि गरज ओळखून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला स्थानिकानी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि प्रभावी वक्ते संजीवन महात्रे यांनी उपस्थिताना प्रभावी भाषण कसे करायचे याचे मार्गदर्शन करुन उपस्थितांची दाद मिळवली. त्याच बरोबर नवोदित वक्ते अभिनेते दिग्दर्शक राम माळी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन, उपस्थिताना मार्गदर्शन केले. दि. 24 फेब्रूवारी पासून प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत पुढील तीन महीने हा उपक्रम सुरु राहणार असल्याचे राम माळी यांनी सांगितले. चांगला उपक्रम आयोजित केल्याबददल स्थानिकानी गोवर्धन चांगो भगत याचे कौतुक केले. अधिक माहिती करिता 8070009825 या न संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .
प्रभावी बोला , जग जिंका – संजीवन म्हात्रे
February 18, 2019
79 Views
1 Min Read

-
Share This!