डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सेवा आता उत्तमोत्तम मिळणार असल्याने नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सोमवारी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील रेडीओलॉजि व पॅथोलाॅजीचे भूमिपूजन संपन्न झाले.पी.पी.पी.तत्वावर अत्याधुनिक सिटी स्कॅन,एम.आर.आय,सोनोग्राफी,पॅथोलाॅजी या सेवा रुग्णांना अगदी कमी दरात मिळणार आहे. एका महिन्यात हि सेवा कल्याण डोंबिवली महापालिका व क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. ठाण्यानंतर डोंबिवलीत प्रथमच होणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा लाभ डोंबिवली पासून कसारा,कर्जत पर्यत गरीब रुग्णांना होणार आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयाच्या आवारात हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,आयुक्त गोविंद बोडके,महापौर विनिता राणे,आमदार डॉ. बालाजी किणीकर,स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे,सभागृहनेते श्रेयस समेळ,गटनेते दशरथ घाडीगावकर, शहरप्रमुख राजेश मोरे,डॉ. राजू लवांगरे भाजपा गटनेते विकास म्हात्रे,मनसेचे गटनेते मंदार हळबे, भाजपा नगरसेविका ऋषाली जोशी, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे,रमेश म्हात्रे, वामन म्हात्रे, शिवसेना पदाधिकारी किशोर मानकामे,वामन म्हात्रे,परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, शिवसेना नगरसेविका दिपाली पाटील, महिला पदाधिकारी स्मिता बाबर, किरण मोंडकर,मंगला सुळे,परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आपल्या छोटेखानी भाषणात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, शिवसेनेने यापूर्वीच कळवा येथील ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात खाजगी तत्वावर या सेवा सुरु करण्यात आल्या असून याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेतील व कर्जत-कसारा पर्यतच्या रुग्णांना होणार आहे. आरोग्याच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर असे कार्य होऊ शकते. असे लवकरच शास्त्रीनगर रुग्णालयात शवचिकित्सा केंद्र सुरु करण्यात येणार असून डोंबिवलीत पश्चिमेला हरिओम पूजा व लोकधारा सेटर येथे डायलेसिस सेंटर सुरु करण्यात येणार आहे. यामुळे अत्याधुनिक सुविधा गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात उपलब्ध होणार आहे.यामुळे नागरिकांचे प्राण व पैसे वाचणार आहेत.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवांगरे यांनी प्रस्तावना केली. आयुक्त गोविंद बोडके, सभापती दिपेश म्हात्रे,मनसे गटनेते मंदार हळबे यांनी भाषण केले
कमी वजन असलेल्या नवजात बालकांसाठी एमआयसीयू सुविधा दोन महिन्यात पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात….
कमी वजन असलेल्या नवजात बालकांसाठी एमआयसीयू सुविधा पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात येत्या दोन महिन्यात उपलब्ध होणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी यावेळी दिली. या नवजात बालकांसाठी एमआयसीयू सुविधा खाजगी रुग्णालयात अत्यंत महागडी असून ती प्रत्येकाला परवडेल असे नाही.मुंबई, ठाण्यात हि सुविधा उपलब्ध असून डोंबिवलीतील पालिकेच्या रुग्णालयात ही सेवा मिळणर असल्याने नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.-