डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डोंबिवलीत बहुजन समाज पक्षाच्या वतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. डोंबिवली शहर शाखेतर्फे डोंबिवली पश्चिम ते पूर्व इंदिरा चौकात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देत पुष्पहार अर्पण केले. तरुणांनी मोटरसायकल आणि रिक्षा चालवून रॅली काढून `छत्रपती शिवाजी महाराज की जय` अश्या घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने इतिहास घडविलेला आहे.त्यांच्या अलौकिक कार्याने जागतिक युगपुरुषांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले जाते. समतेचे राज्य महाराजांनी आणले.रयतेच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र हि संकल्पना राबविली.अशा युगंधराची जयंती आपण बहुजनांनी साजरी केलीच पाहिजे,असे बसपा प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डोंबिवलीत बसपा वतीने मोटरसायकल रॅली
February 19, 2019
45 Views
1 Min Read

-
Share This!