गुन्हे वृत्त

८०० रुपयांची लाच घेताना वाहतूक पोलीसाला ACB कडून अटक

नंदुरबार  : वाहनचालकाकडून ८०० रुपयांची लाच घेताना नंदुरबार येथील पोलीस कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. रविंद्र सनसिंग ठाकरे असे त्याचे नाव आहे.

नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधिक्षक जाधव यांनी सांगितले की, जिल्हा अक्कलकुवा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार रविंद्र सनसिंग ठाकरे याने तेथील रहवाशी वाहन चालकाकडे कालिकामाता मंदिर परिसरातून अवैधरित्या क्षमता नसताना कोंबून वाहतूक करत आहात. अवैध रित्या वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. तुम्ही आदेशाचे पालन केले नाही. यासाठी आठशे रुपये मला द्यावे लागतील त्यानंतर वाहनचालकाने यासंदर्भात अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून नंदुबार ब्युरो कार्यालयात पोलीस स्टेशन आवारात सापळा रचत पैसे घेताना रंगेहात पकडला. पोलीस अधिकारी करुणाशील तायडे व साक्षिदार समोर आरोपी रविंद्र ठाकरेला लाच घेताना अटक केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!