गुन्हे वृत्त

दोन  हजारांच्या बनावट नोटा छापणाऱ्याचा भांडाफोड

डोंबिवली  :- डोंबिवलीतील पोलिसांनी  नवी मुंबईतील एका भूषण साळुंखे नावाच्या तरुणाला अटक केली आहे. युट्युब वर नोटा कशा तयार होतात हे पाहून त्यानंतर एका प्रिंटरच्या साहाय्याने त्याने २  हजारच्या नकली नोटा तयार करण्याचे काम भूषणने  सुरू केले. मात्र एका व्यवहारातून या प्रकरनाचा भांडाफोड झाला  .

     नवी मुंबईतील कामोठे येथे भूषण साळुंखे याचा भाजी पाला विक्रीचा व्यवसाय आहे. भूषणला डोंबिवली येथे राहणाऱ्या  सुकेशला  ५०  हजार रुपये द्यायचे होते. भूषणने दिलेले पैसे  जेव्हा सुकेश एका बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेला असता हे ५०  हजारच्या २५  नोटा खोट्या असल्याचे आढळून आले.बँक प्रशासनाने याची माहीती विष्णू नगर पोलिसांना दिली. विष्णू नगर पोलिसांनी सुकेशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याला हे पैसे भूषणने दिल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांनी भूषणला अटक केली.तपासादरम्यान भूषण ने युट्युबवर नोटा कशा बनवतात याचा व्हीडोयो बघून  प्रिंटर मशीनच्या साहाय्याने  २  हजारच्या नोटा तयार केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी भूषणकडून पोलिसांनी एक प्रिंटर मशीन जप्त केली आहे. याआधी भूषणने किती व कुठे या बनावट नोटा चालवल्या  हे या तपासात स्पष्ट होणार आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!