मुंबई : प्रवासादरम्यान गहाळ झालेले (4 लाख 25 हजार रुपयांचे) 12.5 तोळ्यांचे दागिने अवघ्या दीड तासात महिलेला परत मिळाले. ही उत्तम कामगिरी परिमंडळ 4 च्या हद्दीतील अॅण्टॉप हिल पोलिसांनी केली
25 फेब्रुवारी 2019 रोजी स्नेहल संतोष कोळी या नाहुर रेल्वे स्थानक ते सायन-शिवाजी चौक दरम्यान उबेर टॅक्सीने प्रवास केला. प्रवासादरम्याने स्नेहल याची एक बॅग कररमधील राहिली. कार निघून गेल्यावर त्यांना बॅगेची आठवण झाली. रात्री 11 वाजता त्या अण्टॉप हिल पोलीस ठाण्यात आल्या.
स्नेहल यांनी घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलीस निरीक्षक चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाउलबुद्धे, पोलीस उपनिरीक्षक कांगुने, पोलीस उपनिरीक्षक झाडे व पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे उबेर टॅक्सी चालकाचा शोध घेऊन दागिन्यांची बॅग ताब्यात घेऊन स्नेहल कोळी यांना परत केली.
गहाळ झालेले दागिने परत मिळाल्याने स्नेहल कोळी यांनी अॅण्टॉप हिल पोलिसांचे आभार मानले.