मुंबई : (अश्विनी निवाते) महिला बचतगट वरळीगांव याच्या सहकार्याने वरळी कोळीवाडा या ठीकाणी बुधवार दि.२७ फेब्रुवारी २०१९ रोजी सायं ७.वा मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून नंदिनीज् किचन या उपहारगृहाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आमदार सुनील शिंदे उपाहारगृहाच्या संचालिका नवोदित महिला उद्योजिका माधवी निर्मळ, चंद्रकात निर्मळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नातेवाईक, मैत्रिणी, समाजबांधव यांनी शुभेच्छा दिल्या. माधवी निर्मळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी एक उत्तम गृहीणी आहे असा विश्वास व आर्थिक नियोजन या सर्व गोष्टींमध्ये मला माझ्या पतींची साथ व मार्गदर्शन लाभली. अस्सलं घरगुती , अस्सलं मराठी* या शीर्षकाचे स्पष्टीकरण मांडताना सांगितले की आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ग्राहक वर्ग फासफूडला पसंती देतात परंतु पारंपारिक व उत्तम दर्जाचे जेवणाचा आस्वाद घेता यावा व महिलांना रोजगार उपलब्ध होईल ही या मागची योजना आहे. महीला वर्गाने सांगितले की आमच्या या लाडक्या मैत्रिणीने या महिला सक्षमीकरणाच्या काळात आम्हांला या व्यवसायात सहभागी करुन आमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास मदत केली. अशीच भविष्यात उत्तुंग भरारी घेऊन आपल्या या मैत्रिणीला मनःपूर्वक शुभेच्छा
महिला उद्योजिकांची उत्तुंग भरारी…
February 28, 2019
260 Views
1 Min Read

-
Share This!