ठाणे

‘लाच’ म्हणून केली शरीर सुखाची मागणी

कल्याण : लाच स्वरुपात पैसे, वस्तू मागितल्या जातात. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील लिपिकाने एका ३० वर्षीय महिलेकडे लाच म्हणून शरीर सुखाची मागणी केली. या लिपिकाला ॲन्टी करप्शनच्या पथकाने आज (गुरुवार) गार्डनमध्ये सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत (वय-४८) असे अटक करण्यात आलेल्या महापालिकेच्या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारदार महिलेच्या राहत्‍या घराचे प्रलंबित मालमत्ता कर भरण्यास राजपूत याने जप्ती वॉरंट बजावणी पूर्व अखेरची सूचना काढली होती. या नोटिसच्या अनुषंगाने मालमत्ता कर भरण्यास मुदत वाढवून देण्यासाठी व मालमत्ता कराची रक्कम कमी करून देण्यासाठी राजपूत याने लाचेच्या स्वरुपात या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेच्या तकारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी सुभाष मैदान येथील गार्डनमध्ये तक्रारदार महिलेला भेटण्यासाठी बोलावले असता, त्यादरम्यान कारवाई करुन राजपूत याला ताब्यात घेण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!