मुंबई

संजय बर्वे यांची  मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

मुंबई : राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक संजय बर्वे यांची  मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांची राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय बर्वे हे १९८७ च्या बॅचचे आय़पीएस अधिकारी आहेत. गृहविभागाने संजय बर्वे यांची महासंचालकपदी बढती करत राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी बदली केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांची बदली दोन वर्षापासून रिक्त असलेल्या लाच लुचपतच्या महासंचालकपदी बदली करण्यात आली होती. बर्वेंचे नाव आधीपासूनच मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी चर्चेत होते. मराठी अधिकारी म्हणून भाजपसह मित्रपक्षांचाही त्यांच्या नावाला पाठींबा होता. संजय बर्वे हे याच वर्षी निवृत्त होणार आहेत.

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!