ठाणे : प्रतिनिधि (संतोष पडवळ ) ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडिया, मुंबई तर महिलागटात डब्लूटीआर,इन्फ्रा मुंबई या संघांनी विजेतेपद पटकावले.विजेत्या संघाना महापौर सौ.मिनाक्षीराजेंद्र शिंदे यांच्या शुभहस्ते प्रत्येकी रोख रुपये १ लाख व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. दरम्यानमहिला गटात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ठाणे महापालिकेच्या महिला कबड्डी संघाने उपविजेतेपद पटकावले. पुरुष गटातील उप विजेत्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया व महिला गटातीलठाणे महापालिका संघाला प्रत्येकी ७५ हजार रुपये व ट्रॉफी देवून गौरवण्यात आले.
यावेळी उप महापौर रमाकांत मढवी,सभागृह नेते नरेश म्हस्के,शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के,ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष अशोक वैती, नगरसेविकाअंकिता पाटील, दीपाली भगत,दर्शना म्हात्रे, नगरसेवक अमर पाटील, दीपक जाधव, परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक,उपआयुक्त अशोक बुरपुल्ले,सहाय्यक आयुक्त महादेव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने दिव्यातीलदिवा महोत्सव क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीयकबड्डी स्पर्धेला
क्रीडा रसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.या स्पर्धेत पुरुष गटात18 तर महिला गटात15 संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी पुरुष गटाच्या अंतिम लढतीत एअर इंडियामुंबई आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया आमने सामने होते. यात एअर इंडिया संघानेसेंट्रल बँक ऑफ इंडिया संघावरएकतर्फी विजय संपादित करत विजेतेपदावर कब्जा केला. पुरुष गटात उत्कृष्ट चढाईपट्टू म्हणूनसुशांत साईल,उत्कृष्ट पकड काळीराम म्हात्रे, उद्योन्मुख खेळाडू अक्षय मकवाना तर उत्कृष्ट खेळाडूपंकज मोहिती यांनी किताब पटकावला.
तर महिला गटामध्ये डब्लूटीआर आणि ठाणे महानगरपालिका ठाणे या संघांमध्ये अंतिम लढतरंगली. अटीतटीच्या झालेल्या या सामान्यात संघाने विजय मिळवला. महिला गटात उत्कृष्ट चढाईपट्टू म्हणून सायली केरीपले,उत्कृष्ट पकड पौर्णिमा जेधे, उद्योन्मुख खेळाडू अदिती जाधव तर उत्कृष्ट खेळाडू कोमल देवकर यांनी किताब पटकावला.