ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचे 101 कोटी 79 लाख रुपयांचे बजेट सभागृहात सादर करण्यात आले. मागील वर्षापेक्षा यंदाच्या बजेटमध्ये 35 कोटींची वाढ झाली आहे. मागच्या वर्षी मूळ बजेट 64 कोटी 99 लाखांचे आणि सुधारित बजेट 78 कोटी 54 लाख 50 हजार रुपयांचे झाले होते. यावेळचे बजेट अर्थ समितीचे सभापती सुभाष पवार यांनी सादर केले. बजेटमध्ये दिव्यांगांसाठी 3 चाकी स्कुटी या योजनेसह शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन, ग्रामपंचायतीशी संबंधित अनेक योजना सादर करण्यात आल्या आहेत. विरोधी नेते कैलास जाधव यांनी कृषी विभागासाठी 5 कोटींची वाढीव तरतूद करावी अशी मागणी केली. बजेट जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव आणि मुख्याधिकारी एच एस सोनावणे यांच्या उपस्थितीत सादर झाले.
ठाणे जिल्हा परिषदेचे 101 कोटी 79 लाखांचे बजेट
March 2, 2019
30 Views
1 Min Read

-
Share This!