गुन्हे वृत्त

पोलिस अधिक्षकांनी केला २ पोलिस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल…. बोईसर – पालघर पोलिसांचा भ्रष्टाचारात मोठ्या प्रमाणावर वाढ…

बोइसर : बोइसर पोलिस स्टेशनच्या दोन पोलिस उपनिरीक्षकांनंतर पोलिस अधिक्षक गौरव सिंह यांच्या विशेष पथकातील अधिकाऱ्यांना खुद पोलिस अधिक्षकांनीच दाखल केला खंडणी गुन्हा दाखल, यामुळे पोलिस दलासह सर्वञ खळबळ उडाली असून, मागील दोन वर्षापासून ह्या पथकातील अधिकारी त्यांच्या झिरो पोलिसांव्दारे ज्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत असे त्यांना हप्त्यासाठी प्रताड़ित करत असत व त्यांना मारहाण ही करत असत. पालघर बोईसर येथिल एका व्यापाऱ्यास आशाच प्रकारे काही दिवसापूर्वी अवैध गुटखा प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. यानंतर राजु दुबे या हस्तका मार्फत त्यांचाकडे ५ लाख रुपयाची मागणी करण्यात येत होती व यासाठी तगादा ही लावण्यात आला होता. या बाबत पिडीताने मा. पोलिस अधिक्षक सो पालघर गौरव सिंह यांच्याकडे तक्रार दिल्या नंतर दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी राञी उशीरा या दोन अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मल्हार थोरात व सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे सह त्यांचा खाजगी हस्त राजु दुबे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, बोईसर पोलिस स्टेशन मध्ये त्यांचावर भा.द.सं.वि.कलम ३८४, ३८९, २१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढिल तपास पोलिस अधिक्षक गौरव सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू अाहे.

दरम्यान या अधिकाऱ्यांनी ५ लाख रुपये इतक्या रकमेची मागणी केलेली होती त्या ऐवजी चारच लाख दिल्याने तक्रारदाराच्या भावास व अन्य एकास मारहाण ही केल्याचे समजते आहे.
आशा प्रकारचा तक्रारी वा कोणास ञास झाला असल्यास त्यांनी पोलिस अधिक्षक सो पालघर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!