भारत : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तान सरकारने मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण पाकिस्तानमधील माध्यमांनी मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय. दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचं काही संस्था सांगत आहेत. तर मसूद अजहर हा भारतीय हवाई दलाच्या बॉम्ब हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा दावा पाकिस्तानच्या माध्यमांमधून करण्यात येतोय.
मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता. भारतात दहशतवादी कारवायांसाठी त्याने पाकमध्ये प्रशिक्षण तळं उभारली होती.