गुन्हे वृत्त

बनावट पदवी प्रमाणपत्र विक्री करणाऱ्या आरोपींना अटक

ठाणे : प्रतिनिधि – (संतोष पडवळ) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट अँड इंजिनियरिंग नागपूर या संस्थेच्या कडुन कोणत्याही व्यक्तीला त्याची शैक्षणिक पात्रता नसताना त्याच्या कडुन पैसे घेउन डिप्लोमा ईन मेकनिकल इंजिनियरिंग , बी टेक , एम .बी .ए ., बीबीए या कोर्सेसचे तसेच 10 वी 12 वी दिल्ली बोर्डाचे मार्कशीट व सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीला ठाणे क्राईम ब्रांच यूनिट 1 ने अटक केली आहे .

ठाणे क्राईम ब्रांचचे यूनिट 1 चे पोलीस नाईक रविंद्र काटकर यांना माहीती मिळाली होती , बनावट प्रमाणपत्र देण्यासाठी व वरील संस्थेची माहीती देण्यासाठी कल्याण शीळ रोड धावडी नाका डोंबिवली पूर्व येथील मिर्ची हॉटेल येथे एक महीला येणार असुन तिच्या कडे बरेच बनावट सर्टिफिकेट आहेत , त्या अनुषंगाने तीथे सापळा रचून त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले , तिच्या कडे बनावट हॉल तिकीट , मार्कशीट , पदवी प्रमाण पत्र व बोर्ड सर्टिफिकेट मिळुन आले , पोलीसांनी या संस्थेची सत्यता तपासण्या साठी मुंबई येथील ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’ चर्चगेट आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या कडुन माहीती घेतली असता वरील संस्थेस कोणतीही मान्यता नसल्याचे समजले , त्या प्रमाणे दिनांक 4/3/2019 रोजी या संस्थेचे संचालक व कार्यकारी मंडळ यांच्या विरोधात 420,465,468,471,34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला .

दिनांक 5/3/2019 रोजी गुन्हे शाखेने नागपूर येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट यांच्या मुख्य कार्यालयावर व उप कार्यालयावर छापे मारून संस्थेचे 722 मार्कशीट , 214 प्रमाणपत्र , डॉ .बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी चे 15 मार्कशीट , 4 प्रमाणपत्र , छत्रपती शाहूजि महाराज युनिव्हर्सिटी कानपुर चे 25 मार्कशीट व 37 प्रमाणपत्र ,डॉ .सी व्ही .रमन युनिव्हर्सिटी बिलासपुर छत्तीसगड चे 1 मार्कशीट , 74 प्रमाणपत्र असे एकूण 763 मार्कशीट आणि 353 प्रमाणपत्रे हस्तगत करण्यात आली , या कारवाईच्या दरम्यान या संस्थेचा अड्मिन मोहमद अझहर मोहंमद इस्माईल अन्सारी वय 27 वर्ष राहणार मोमीनपूर नागपूर आणि 5 महिला पदाधिकारी यांना अटक करण्यात आली त्यांना न्यायालयाने 11/3/2019 पर्यन्त पोलीस कस्टडी देण्यात आली आहे, या आरोपींनी आतापर्यंत किती लोकांना अशी सर्टिफिकेट विकली आहेत याची चौकशी सुरु असुन असे सर्टिफिकेट घेणाऱ्या लोकांवर सुध्दा कारवाई होणार असल्याचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगीतले , तसेच त्यांनी लोकांना सुध्दा आव्हान केले आहे की , अशा डिग्र्या देणाऱ्या लोकांकडून बोगस डिग्र्या घेउन स्वतःची फसवणूक करू नका व असे कोणी करत असल्याचे आढळल्यास त्याची त्वरित माहीती पोलिसांना द्यावी .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!