ठाणे

ठाणे पोलीस आयुक्तालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

ठाणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त श्री. विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे कामाच्या ठिकाणी स्वागत केले. तसेच महिलांना कामाच्या ठिकाणी समान संधी उपलब्ध करू देऊ असे सांगून महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील महिला नागरिक व महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचेकरीता सायबर सुरक्षा व सुरक्षितता विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या आदेशान्वये जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व विविध शाखा येथे महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस खात्यास दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम आयोजित करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!