तारापूर (पालघर) : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चिल्हार फाटा येथे स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅन पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ज्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली त्या ठिकाणाहून २० किलोमीटरच्या अंतरावर संवेदनशील असे तारापूर अणुशक्ती केंद्र आहे.
काही दिवसांपूर्वी वसई तालुक्यातील चांदीप येथे जिलेटिन आणि डिटोनेटरचा मोठा साठा जप्त केला होता. ही घटना ताजी असतानाच दोन पिकअप भरुन स्फोटकांचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अहमदाबाद माहार्मावरील चांदीप आणि सायवन येथे वाळू माफियांच्या घरांवर आणि आड्ड्यावर छापे टाकून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली होती.