मुंबई : प्रतिनिधि – (संतोष पडवळ) राज्य मंत्रिडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. यात तब्बल 18 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आज झालेल्या या बैठकीत 500 चौरस फूटापर्यंतच्या मालमत्तेला करातून सुट देण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. शिवसेनेने मुंबईतील 500 चौरस फुटांची घरं करमुक्त करण्याचं आश्वासन दिले होते. ते आश्वासन आता पूर्ण करण्यात आलं आहे.
आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाखो प्रकल्पबधितांना दिलासा देणाऱ्या स्वयंपुनर्विकास धोरणाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान शिवसेनेने मुंबईतील 500 चौरस फुटांची घरं करमुक्त करण्याचं आश्वासन दिले होते. शिवसेनेच्या या मागणीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता देत मंजुरी दिली आहे.