मुंबई

परम बीर सिंग यांची लाचलुचपत प्रतिबंधक महासंचालक पदी नियुक्ती

मुंबई : अप्पर पोलीस महासंचालक परम बीर सिंग यांना महासंचालक पदी बढती देण्यात आली असुन त्यांची नियुक्‍ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदी करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत.

परम बीर सिंग हे सध्या पोलीस महासंचालक कार्यालयात अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणुन कार्यरत होते. दि. २८ फेब्रुवारी रोजी राज्याचे पोलीस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर हे सेवानिवृत्‍त झाले. त्यांच्या जागी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्‍ती करण्यात आली तर मुंबईच्या पोलीस आयुक्‍तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. तेव्हापासुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांचे पद रिक्‍त होते. त्या जागी आता परम बीर सिंग यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!