लोणावळा : खोपोलीजवळ आज अपघातात ट्रक आणि आर्टिगा कारच्या धडकेत तीन जण ठार झाले. तर दुसऱ्या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर झालेल्या दुसऱ्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी दोन जणांना पनवेलच्या एमजीएम तर एकाला लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अपघातात ठार झालेल्या तीन जणांचे मृतदेह खालापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
मुंबईहून आर्टिगा कारने तीन प्रवासी पुण्याच्या दिशेने निघाले होते. खालापूर हद्दीतील फुडमॉल येथे कार चालक भरधाव असताना चालकाचे नियंत्रण सुटले व पुढे असलेल्या ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह दोन प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर त्याच ठिकाणी दुसऱ्या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
दोन्ही अपघात दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडले आहेत. अपघातानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तर घटनास्थळी पोलीस व मदतनीस दाखल झाले आहेत.