ठाणे

आईच्या शोधात निघालेला चिमुकला दिव्यात सापडला… रेल्वे पोलिस, प्रवासी संघटनेचे माऊलीने मानले आभार…

दिवा :- (   शंकर जाधव ) कामावर गेलेल्या आईला भेटण्यासाठी कळवा रेल्वे स्थानकात लोकलमध्ये आईला शोधत असलेल्या तीन वर्षांच्या चिमुकला प्रवाश्यांच्या जागरूकतेमुळे आईला सापडला. आपले लेकाला पाहून माऊलीच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. रेल्वे पोलिस, प्रवासी संघटनेचे माऊलीने आभार मानले. दिवा रेल्वे स्थानकात घडलेल्या प्रकारची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

      कळवा येथील शांतीनगर झोपडपट्टी राहणारा तीन वर्षांचा कार्तिक कैलास उपाध्याय हा तीन वर्षांचा मुलगा नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी आपल्या भावंडांसोबत खेळत होता. याचदरम्यान भावंडांची साथ सोडून आईला भेटण्यासाठी दिव्याला जायचा विचार त्याच्या मनात आला. त्याने त्यासाठी कळवा रेल्वेस्थानक गाठून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल पकडली व तो दिवा स्थानकात उतरला. सायंकाळी साडे सातच्या सुमारास कार्तिक दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २वर एकटाच फिरत असल्याचे प्रवाश्याच्या निदर्शनात आले.प्रवाशांनीयाची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला दिली.त्यानंतर कार्तिकलालोहमार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आले. रेल्वेस्थानकात कार्तिकचे वर्णन करणारी उद्‌घोषणा करत पालकांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही.  दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या आरती मुळीक-परब आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी त्या मुलाला ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले.नंतर परब यांनी त्याच्या आईचा शोध सुरु केला. जवळपास दोन तास शोधघेतल्यानंतर कार्तिकच्या घराच्या घराचा पत्ता  लागला. तेथून सिद्धेश देसाई यांनी कार्तिकच्या आईचा शोध घेऊनकार्तिकच्या आईला घेऊन लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. दिव्यातील महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पोलीस संदिप अहिरे, अनिल चव्हाण आणि ठाणे लोहमार्ग पोलिस यांनी विशेष मेहनत घेतली.सर्तक रेल्वे पोलिस, पत्रकार,जागृत नागरीक एकत्र आल्यामुळे एका माऊलीला तिचा हरवलेला मुलगा मुलगा मिळाल्याचे कळवा पारसिक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी सांगितले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!