डोंबिवली :- ( शंकर जाधव ) येत्या १५ -२० दिवसात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने तरण तलावासाठी प्रवेश घेतात व्यायामपटू रोज व्यायाम करतात पण येत्या दोन दिवसात हे सर्व लेखणीच्या फटकाऱ्याने बंद होणार आहे .२९ एप्रिल रोजीमतदान असले तरी आता पासून आयोगाने फर्मान सोडले आहे यामुळे क्रीडा वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
क्रीडा संकुलातील बंदिस्त वाजपेयी सभागृह पालिकेने दिले आहेत पण आता बाजूला असलेले तरण तलाव बंद करून जागा रिकामी करण्यास सांगितले आहे तसेच व्यायाम शाळेतील साहित्य बाहेर काढून हॉल रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे व्यायाम शाळेतील साहित्य खाली फिट करून ठेवले आहे ते कसे व कोण काढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तर २ महिने तलाव बंद केला तर पाणी खराब होण्याची भीती आहे. क्रीडा संकुलाचे मैदानही वापर्णयास मनाई केली असताना दोन महिने वेळ असताना इतकी घाई का असा प्रश्न विचारला जात आहे या मुळे विद्यार्थी नाराज होणार असले तरी आयोगाच्या मनमानिपुढे कोण उघडपणे बोलण्यास तयार नाही आयोगाने बंदिस्त क्रीडागृह घ्यावें पण तरण तलाव व व्यायामशाळा बंद करण्यास सांगणे अन्यायाचे आहे. १ एप्रिल पासून नवे प्रवेश होत असतात त्याच काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला असून अधिकारी अधिकृत बोलत नाहीत, मात्र असा फतवा आला असल्याचे मान्य करीत आहेत.