डोंबिवली( शंकर जाधव) स्टेशनपरिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केल्याने आता फेरीवाल्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णय घेणार आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर उभे राहणाऱ्या फेरीवाल्यांना आता कोणाकडे न्याय मागवा असा प्रश्न पडला. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आपल्या न्याय मिळावा म्हणून निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आल्याचे कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी ‘ आपले शहर वृत्तवहिनीला’ ला सांगितले. त्यामुळे 5 हजार मतांचा या निवडणुकीतील उमेदवारांना विचार करावा लागणार आहे. तर या फेरीवाल्यांची मनधरणी करण्यास उमेदवारांना यश येईल का हे लवकरच येईल.
ब्रेकिंग न्यूज – लोकसभा निवडणुकीवर डोंबिवलीतील सुमारे 5 हजार फेरीवाले टाकणार बहिष्कार….
March 13, 2019
98 Views
1 Min Read

-
Share This!