ठाणे

थेट भेटीतून संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी साधणार डोंबिवलीकरांशी संवाद

डोंबिवली :  (  शंकर जाधव  ) तरुणाईचे संगीतकार, लेखक, मधली सुट्टी या मालिकेतून आणि झी सारेगमचे परीक्षक म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणारे आणि आता वेडींगचा सिनेमा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हि नवी ओळख लाभलेले डॉ. सलिल कुलकर्णी डोंबिवलीकरांनी आपल्या सांगितीक कारकिर्दी विषयीच्या आठवणी, किस्से डोंबिवलीकरांसमोर मांडणार आहेत.
   निमित्त आहे थेट भेट या कार्यक्रमाचे. मधुमालती एन्टरप्रायझेस, मुक्तछंद आणि अभिव्यक्ती या तीन संस्थांनी एकत्र येऊन  या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार 16 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 दरम्यान सर्वेश हॉल येथे हा कार्यक्रम पार पडणार असून रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे. डॉ. सलिल कुलकर्णी यांच्याशी सौरभ सोहोनी संवाद साधणार आहेत. एक संगीतकार म्हणून सलील कुलकर्णी यांनी आत्तापर्यंत आपली स्वतंत्र छबी तयार केली आहे. याचबरोबर लपवलेल्या काचा, शहाण्या माणसांची फॅक्टरी या पुस्तकाच्या माध्यमातूनसुद्धा ते लोकांना भेटीला आले आहेत. आजच्या घडीला लता मंगेशकर ते आर्या आंबेकर अशा सर्व जनरेशनमधील गायकांनी त्यांची गाणी सादर केली आहेत. ही गाणी सादर करतानाचे किस्से , रेकॉर्डिंगचे अनुभव, संगीतातील प्रवास त्याचबरोबर आगामी वेडिंगचा शिनेमामधील गमतीजमती डॉ. सलील कुलकर्णी लोकांसमोर मांडणार आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!