मुरबाड : मुरबाड शहरातील गोड्याचा पाडा ते बागेश्वरी तलाव दरम्यान नव्याने बांधलेल्या निकृष्ठ मोरवीला अवघ्या काही दिवसांतच धोकादायक भगदाड पडल्याने या कामाचा बोगस दर्जा आमच्या न्युज चॅनेलने चव्हाट्यावर आणला होता. मात्र याबाबत कोणते ही विभाग जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हते. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी पाठपुरावा करून अखेर सदरचे बोगस काम करणाऱ्या शासकीय खात्याचे शोध घेतले आहे.
सदरचे निकृष्ठ काम मुरबाडच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाने केल्याचे उघड झाले असून यापूर्वी मुरबाडच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता सुनील घुगे यांना अनेकदा फोन द्वारे तथा प्रत्यक्षात विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट नकार देऊन जन माहिती लपविल्या गैरप्रकार केला आहे. या कामाची देखरेख विभागाचे अभियंता भामरे म्हणून पाहत असून त्यांनी ही यापूर्वी हे काम आमचे नसल्याचे सांगितले होते.
मात्र सलग तिन वेळा दुरुस्ती होऊन पण काम निकृष्ठ व बोगस झाल्याने तथा आमच्या प्रतिनिधींनी याचा रितसर पाठपुरावा केल्याने या जिल्हा परिषद विभागाला नाईलाजाने या कामाची जबाबदारी कबूल करणे भाग पडले.
तर सद्यस्थितीला या मोरवीमध्ये ठेकेदाराने पुन्हा जुने फुटलेले व तडे गेलेले पाईप टाकल्याचे आमच्या न्युज चॅनेलने प्रसिद्ध केले होते. मात्र मुरबाडच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता सुनील घुगेच प्रत्यक्ष या ठेकेदाराला अभय देत असल्याने कारवाईचा प्रश्न उरला नाही. मात्र अशा कर्तव्य शून्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई व्हावी तसेच शासनाला लुटणाऱ्या या ठेकेदारावर कठोरातकठोर कारवाई व्होवून सदरची एजन्सी ब्लॅक लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी गावकरी व संबंधित तक्रारदारांनी केली आहे.