भारत

लोकसभा निवडणुकीसाठी ४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई : दि. 19 : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत आज राज्यातील तीन मतदारसंघात एकूण4 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

7 लोकसभा मतदारसंघात काल पहिल्या टप्प्याची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली. तर आज 10 लोकसभा मतदार संघातील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली. आज11- भंडारा- गोंदिया मतदारसंघात सुहास अनिल फुंदे (अपक्ष) आणि भीमराव डी. बोरकर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया(डी)) यांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली. 16-नांदेड लोकसभा मतदार संघात पठाण जाफर अली खान एम. खान (इंडियन डेमोक्रॅटिक मूव्हमेंट) यांनी आणि 42- सोलापूर मतदार संघात वेंकटेश्वर एम. उर्फ खटकधोंड (हिंदुस्थान जनता पार्टी) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

काल 10- नागपूर लोकसभा मतदार संघात अब्दुल करीन अब्दुल गफ्फार पटेल (अपक्ष) यांनी आणि14- यवतमाळ मतदार संघात सुनील नटराजन नायर (अपक्ष) आणि रमेश जी. पवार (भारतीय बहुजन आघाडी जनता दल (एस.)) यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली,अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!