डोंबिवली :- ( शंकर जाधव ) डोंबिवलीत तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या चिऊ पार्कमध्ये अनेक शाळांचे शेकडो विद्यार्थी वरचेवर भेट देऊन पक्षी जगताविषयी माहिती जाणून घेतात. जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट क्लब दरवर्षी काही पर्यावरणपूरक असा विशेष उपक्रमही राबविले. यंदा बुधवारी सकाळी डी. आर. म्हैसकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी चिऊ पार्क भेट आयोजित करण्यात आली होती.
या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भीमाताई पवार, सहाय्यक शिक्षिका वसुधा पत्की, विजया खालकर, रुपाली राऊत यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना बागेत आणून रोटरीच्या आदींच्या उपस्थितीत डी. आर. म्हैसकर शाळेच्या शिक्षिका आणि तिसरी-चौथी इयत्तेच्या मुला-मुलींसाठी पक्षीप्रेमी स्वप्नील कुलकर्णी याचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. चिमण्या, रॉबिन, शिंपी, तांबट, फॅनटेल, साळुंक्या, कबूतर, कावळे, सरडे, खारी, घार, पोपट, हळद्या, कोकीळ,पावशा, चातक, शिक्रा, असे अनेक पक्षी-प्राणी या पार्कात कसे येऊ लागले, पक्ष्यांच्या किती जाती आपल्या परिसरात दिसतात, नर-मादी कसे ओळखावे ? अशी भरपूर माहिती स्वप्नील याने मोठ्या रंजक पद्धतीने मुलांना सांगितली. . अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थ्यांनाही निसर्गमैत्रीची आगळीवेगळी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्यावतीने वसुधा पत्की यांनी रोटरी क्लबचे हार्दिक आभार मानले.