डोंबिवली (शंकर जाधव ) : होळी निमित्ताने पांडुरंग वाडीतील लक्ष्मीनारायण मंदिर गिरीराज हवेली, येथे भगवान श्रीकृष्ण उत्सव साजरा करण्यात आला. ‘ रसिया फुलो की होली ‘ असे या उत्सवास म्हणतात. या उत्सवाचे आयोजन भारती बेन जेठवा व जयश्री बेन त्रिवेदी यांनी केले होते.या उत्सवाची शोभा वाढविण्यासाठी मेहुलभाई यांनी खास मथुरेहून कलाकार आमंत्रित केले होते. मथुरेच्या या कलाकारांनी पारंपरिक गाणी आणि नृत्यच्या माध्यमातून श्रीकृष्ण कथा सादर केली.या उत्सवाला महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. लक्ष्मी नारायण मंदिर विविध फुलांनी आकर्षक रित्या सजविण्यात आले होते. या उत्सवात मुकेश पांडे यांची देखील मदत झाली. सर्व वैष्णव जन भगवान श्रीकृष्ण यांच्या भक्कीत रममाण झाले होते. या उत्सवाचे आयोजन दिनेश चौबे, पियुष रावल, रवी पारेख, कल्पेश पटेल, मुन्ना दबे, अम्बु गुप्ता, जयप्रकाश विश्वकर्मा व आनंद नगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी विशेष सहकार्य केले.