डोंबिवली : कलारत्न चंद्रशेखर संत यांच्या संकल्पनेतून साकारलेला वैश्विक रंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन फडके रोडवरील दातार चौकात करण्यात आले होते.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्रीकृष्ण पूजन करून या उत्सवाचे धुळवडीच्या सकाळी उदघाटन करण्यात आले.डोंबिवलीकर यांनी या उत्सवाचे पहिल्यांदा आयोजन केले होते. विद्ररुपतेकडून सौंदर्याकडे अशी संकल्पना घेऊन डोंबिवलीतील अनेक कलाकारांनीरंगांची उधळण करित आपल्या विविध कला सादर केल्या.व्यासपीठावर महिलांनी सादर केलेले कृष्णभजन सुरु असताना, विविध चित्रकारांनी आपली कला सादर करायला सुरुवात केली. अक्षररचना (कँलीग्राफी) करणाऱ्या कलाकार महिलेने विठ्ठल हि अक्षरे निवडून त्यातून विठ्ठलाच्या मूर्तीचाआकार तयार केला होता.तर स्नेहल चांदे हिने उपस्थिती डोंबिवलीकर नागरिक व बच्चे कंपनीच्या हातावर सुंदर टँटू काढून दिले.डोंबिवलीतील करंदीकर कला अँकँडमीच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी रंगोत्सव साठी सहकार्य केले.शुभम सोनी, मैत्रीली, स्नेहल चांदे, अविनाश, विजय गोवधन, सविता ताटे, श्रेयस, शिक्षक शिवम कांबळे, यांनी विविध कला सादर केल्या. वणिता पाठक यांनी त्रिमितीय- थ्रीडी ओरिगामी कलेतून सुंदर मोटार सायकल तयार केली होती.शशिधर पंधारकर यांनी पुस्तकाचे आकर्षक फोल्डिंग तयार केले होते. हे बघण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती.दुर्गाराज जोशी, अश्विनी भाटे यांनी रंगोत्सव संकल्पना यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे , पूर्व मंडल अध्यक्ष संजीव बिडवाडकर, नगरसेवक राजन आभाळे, संदीप पुराणिक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याबाबत अश्विनी भाटे म्हणाल्या कि, डोंबिवलीत पहिल्यांदा अश्या कार्यक्रमाचे आयोजन करित आहोत. विद्ररुपतेकडून सौंदर्याकडे म्हणजे धुळवडीला एकमेकांना चित्रविचित्र रंग न फासता
कँनव्हासवर सुंदर पेंटिंग करा किंवा शरिरावर नैसर्गिक रंगाद्वारे नक्षीकाम करा. अशी यामागची संकल्पना आहे.डोंबिवलीतील सांस्कृतीक कार्यक्रम सर्वदूर पसरण्याची परंपरा आहे हा उपक्रम देखील असाच विविध राज्यात , शहरात जावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश नायकोडी यांनी केले.