मुंबई

महाआघाडीची पहिली महत्त्वपूर्ण संयुक्त पत्रकार परिषद ; विखे पाटील गैरहजर

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युतीपुढे तगडं आव्हान उभं करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक छोट्या पक्षांना सोबत घेऊन ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ उभारत एल्गार पुकारला असून महाआघाडीच्या पहिल्याच आणि महत्त्वपूर्ण अशा संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर राहिल्याने ‘विखेंचं नेमकं काय चाललंय?’ ही चर्चा नव्याने रंगू लागली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रिपाइंचे (गवई गट) राजेंद्र गवई, जोगेंद्र कवाडे, शेकापचे जयंत पाटील असे महाआघाडीचे सर्व प्रमुख नेते पत्रकार परिषदेला उपस्थित असताना राधाकृष्ण विखे पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहिल्याने त्याबाबत लगेचच कुजबूज सुरू झाली.
दरम्यान, राधाकृष्ण विखेंचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून सुजय यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या घडामोडीनंतर राधाकृष्ण विखेही भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. मात्र, ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली होती.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!