ठाणे

दिव्यातिल साबे गावातील १५ अनधिकृत रूमचे बांधकाम जमीनदोस्त

ठाणे : प्रतिनिधि (संतोष पडवळ )  दिवा येथील साबे गावातील डीजे कॉम्प्लेक्स येथील कांदळवन हटवून सुनील यादव यांनी अनधिकृतपणे बांधलेल्या १५ रूमचे आरसीसी बांधकाम सोमवारी  जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने ही धडक कारवाई करण्यात आली.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले,हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत मुंब्रा प्रभाग समितीक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, स्टॉलवर धडक कारवाई करण्यात येत आहे.

सोमवारी दिवा परिसरातील कारवाई दरम्यान दिवा येथील साबे गाव येथे सुनील यादव यांचे अनधिकृतपणे बांधलेल्या १५ रूम आज जेसीबीने तोडण्यात आल्या.सदरची कारवाई मुंब्रा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी केली असून यापुढेही अनधिकृत बांधकामे, फेरीवाले,हातगाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!