ठाणे

अवैध मद्यसाठे उध्वस्त; पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ठाणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर राज्य उत्पादन शुल्क विभाग डोंबिवली,जि.ठाणे व पोलीस उपअधिक्षक कल्याण यांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे तीन लाख रुपयांचे अवैध मद्यसाठे व ते बनविण्यासाठी लागणारी सामुग्री जप्त करुन नष्ट केली आहे.
यासंदर्भात अधिकृत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाने  दि.23 रोजी हेदुटने गावनदी किनारीता.कल्याण .जि.ठाणे येथे छापा टाकून दोन ठिकाणी कार्यवाही केली. त्यात 6600 लिटर रसायन   लोखंडी बॉयलर ढोल =१०००x, प्लास्टिक ड्रम रसायनाणे भरलेले =३३x२००लिटर असा एकूण  लाख ४८ हजार २००रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . तसेच उपअधिक्षक कल्याण यांनी व अंबरनाथ पोलीसांच्या सह आज दि.26 रोजी  चिंचपाडा गाव व मनेरा गाव येथे  दोन ठिकाणी छापे मारुन गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्थ केले. या कारवाईत 5500 लिटर रसायन, दोन ड्रम, प्लास्टिक टाक्या असे सुमारे 1 लाख 51 हजार 100 रुपयांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई विठ्ठलवाडी पोलीसस्टेशनच्या हद्दीत करण्यात आली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!