ठाणे

मतदान यंत्रांची पहिल्या टप्प्यातील सरमिसळ पूर्ण

ठाणे  : लोकसभा निवडणूकीसाठी ठाणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदार संघांसाठी प्राप्त मतदान यंत्रांचे ( ईव्हीएम, व्हिव्हिपॅट) आज प्रथम टप्प्यात जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सरमिसळ (Randamization)  करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हानिवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर तसेच इव्हीएम नोडल अधिकारी डॉ. संदीप माने, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती अपर्णा सोमाणी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी  यावेळी उपस्थित होते. सदरचे सरमिसळीकरण हे निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. 
जिल्ह्यात मतदार संख्येच्या प्रमाणानुसार 6488 मतदान केंद्र आहेत. तर 227 नवीन मतदान केंद्र प्रस्तावित आहेत. त्यामुळे ती वाढ गृहित धरण्यात आली आहे.  त्यानुसार मतदान यंत्रे ( मतदान यंत्र व कंट्रोल युनिट) व व्हीव्हीपॅट मशीन्स देण्यात येणार आहेत. प्रथम टप्प्यात हे मतदान यंत्र जिल्हास्तरावर स्ट्रॉंग रुम मध्ये इंजिनिअर्स मार्फत तपासून ठेवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्याच्या सरमिसळीनंतर हे यंत्र आता विधानसभा मतदारसंघ निहाय वितरित होतील व तेथे दुसऱ्या टप्प्याचे सरमिसळीकरण होईल. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक निरीक्षक उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!