ठाणे : दिनांक 1/5/2018 रोजी एका बारबालेचा खुन करून बाहेरून दरवाजाला कुलूप लाऊन पळुन गेलेल्या आरोपीला एक वर्षानी ठाणे सेंट्रल क्राईम ब्रांचने अटक केली आहे , हा आरोपी एक वर्ष पोलिसांना चकमा देत होता ,पोलिसांची एक टीम पश्चिम बंगाल येथे पळुन गेलेल्या आरोपीचा माग काढत तिथे पोहचली होती , तिथुन त्याचा तपास काढत त्याला कौसा मुंब्रा येथे अटक करण्यात आली आहे .अशी माहीती पोलीस उपायुक्त (गुन्हे ) दीपक देवराज यांनी दिली.
गोलवली डोंबिवली येथे एका अनोळखी इसमाने एका महिलेचा स्कार्फने गळा आवळून खुन केल्याचा गुन्हा मानपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल झाला होता ,या गुन्हय़ाचा समांतर तपास ठाणे सेंट्रल क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव व त्यांची टीम करत होती , या मयताचे व आरोपीचे कुठेही नाव निष्पन्न नसताना व आरोपी बाबत काहीही धागेदोरे नसताना यातील मयत महिलेचा प्रथम मोबाईल नंबर शोधला असता हा मोबाईल राज मंडल ग्राम लष्करपूर कोलकत्ता राज्य नावाच्या इसमाकडे असल्याचे निष्पन्न झाले , त्या प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदेव , उप निरीक्षक शेलार , पोलीस हवालदार व्हद्लूरे , देसाई अशी एक टीम बांगलादेश बॉर्डरच्या अलीकडे पोहचले , तीथे मयत बाराबालेचा मोबाईल राज मंडल याच्या कडुन हस्तगत केला व त्याच्या कडुन मोठ्या शिताफीने माजीद मंडल याचा मोबाईल मिळवला हाच इसम त्या बारबालेचा खुन करून पळाला होता , माजीद मंडलचा मोबाईल मिळाला पण त्याचा ठिकाणा मिळाला नाहि , तिथुन बांगला देश जवळच असल्यामुळे तो पळुन जाण्याची शक्यता अधिक होती , पंधरा दिवस पोलिसांची टीम तीथे राहुन त्याचा शोध घेत होती , नंतर मोबाईल नंबरचा तांत्रिक द्रुष्ट्या केलेल्या तपासातुन व त्यांना मिळालेल्या माहीती नुसार आरोपी मंडल हा तिथुन दिल्ली येथे गेल्याचे समजले , नंतर दिल्ली वरून मुंब्रा येथे पोहचल्याचे समजले त्या प्रमाणे 28/3/2019 रोजी पहाटे 4:30 दरम्यान कौसा मुंब्रा येथे येणार असल्याचे समजले त्या प्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त एन .टी .कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल ब्रांच च्या अधिकारी यांनी सापळा रचून माजिदुल जलालोद्दीन मंडल वय 28 या ईसमाला अटक केली , त्याच्या कडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली , त्याने सांगीतले त्याच्या मुळगावी राहणारी फुतुली उर्फ फरिदा खातुन उर्फ मिम हिच्या बरोबर सुमारे एक वर्षा पूर्वी ओळख झाली होती , त्यानंतर त्यांच्या मध्ये प्रेम सबंध निर्माण झाले होते , त्यानंतर सुमारे सहा महिन्यापासून ते दोघे एकत्र उपाध्याय चाळ गोलवली डोंबिवली येथे राहात होते , आरोपी मंडल याने तिला सेव्हनस्टार बारमधे वेटर म्हणुन नोकरी करण्यास सांगीतले, आरोपी मंडल याचे 2011 मध्येच लग्न झाले होते त्याची पत्नि व मुलगी मुळगावी राहात होते , फूतली उर्फ मिम हिने मंडल याला आपल्या बरोबर लग्न करण्याचा हट्ट धरला होता , आणि लग्न न केल्यास तूझ्या कुटुंबाला संपवून टाकीन अशी धमकी दीली होती , मंडल याच लग्न झालेल असल्या मुळे तो दुसर लग्न करण्यास तयार नव्हता या वरून त्यांची आपापसात भांडण होत होती .
दिनांक 28/4/2018 रोजी सकाळी 9:00 वाजता फतलू उर्फ मिम हीला मंडल यानी गावी जाण्याकरिता विनवणी केली असता , गावी जाण्यास नकार देऊन तीने आरोपी बरोबर भांडण केले या गोष्टीचा राग येउन मंडल याने मिम याचा ओढणीने गळा आवळून तिला ठार मारून घराच्या दरवाजास बाहेरून कुलूप लावुन पळुन गेल्याची कबुली दिली.