मुंबई : मुंबईकर अब्दुल्ला खान….वय अवघं २१ वर्षे…आयआयटीच्या प्रवेश परीक्षेला अनुत्तीर्ण झाला. पण आयआयटीचं शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांनाही हेवा वाटेल असं यश त्यानं प्राप्त केलंय. गुगलमध्ये त्याला नोकरी मिळाली आहे. १ कोटी २० लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी त्याला देऊ केलीय. लंडनच्या कार्यालयात तो काम करणार असून, सप्टेंबरमध्ये तिथे रुजू होणार आहे.
मीरा रोड येथील श्री एल. आर. तिवारी इंजिनीअरिंग कॉलेजमधून त्यानं शिक्षण घेतलंय. काही दिवसांपूर्वी गुगलनं प्रोग्रॅमिंग साइटवर त्याचं ‘प्रोफाइल’ पाहिलं आणि मुलाखतीसाठी बोलावून घेतलं. ऑनलाइन मुलाखतीचे अनेक टप्पे पार करत त्यानं अंतिम मुलाखतीचा टप्पा गाठला. गुगलच्या लंडन येथील कार्यालयात या महिन्याच्या सुरुवातीला त्याची अंतिम मुलाखत घेण्यात आली. त्यात तो उत्तीर्ण झाला आणि गुगलनं त्याला वार्षिक १.२ कोटी रुपये वेतन दिलं.